साळवे इंग्रजी विद्यालयात वार्षिक क्रिडा महोत्सवाचे उद्घाटन…
साळवे येथील इंग्रजी हायस्कूल मध्ये ग्राम सुधारणा मंडळाचे अध्यक्ष डॉ गिरीश नारखेडे यांच्या हस्ते क्रिडांगण पूजन, ध्वजारोहण आणि मशाली ने क्रिडा ज्योती चे प्रज्वलित केली. क्रिडाज्योत जिल्हा स्तरावरील कुस्ती विजेती विद्यार्थिंनी रेणूका महाजनेच्या प्रज्वलित करण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्ष जी.एन.पाटील होते. त्यांनी सांगितले की खेळात जिद्द, चिकाटी, आत्मविश्वास निर्माण होतो.प्रास्ताविक प्र.मुख्याध्यापक ए.एस.पाटील यांनी केले.संचलनाचे मार्गदर्शन व आज्ञा क्रिडाशिक्षक भूषण बोरोले यांनी दिले. सूत्रसंचालन एस डी मोरे यांनी केले. यावेळी कुस्तीगीर रेणुका महाजन हिला ग्राम सुधारणा मंडळातर्फे एक हजार रूपये आणि शिक्षक व कर्मचा-यामार्फत बत्तीसशे रूपयांची मदत बक्षीस म्हणून देण्यात आले. संचलनात प्रथम व द्वितीय क्रमांक पटकावणा-या लहान व मोठ्या गटांना संचालक मंडळाच्या हस्ते बक्षिसे देण्यात आले. आभार प्रदर्शन सुधाकर मोरे यांनी मानले.