ताज्या बातम्या

हिंगोली विधान परिषदेसाठी डॉ. विवेक नावंदर यांच्या नावाची चर्चा

परभणी प्रतिनिधी राहुल धबाले

भूमिपुत्र डॉ विवेक नावंदर यांना न्याय मिळावा शिवसैनिकांची मागणी

परभणी : परभणी-हिंगोली विधान परिषद मतदारसंघासाठी ठाकरे शिवसेनेकडून डॉ. विवेक नावंदर यांचे नाव निश्चित होईल, असा विश्वास सामान्य नागरिक, शेतकरी, कष्टकरी तसेच सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्त्यांकडून व्यक्त केला जात आहे. डॉ. विवेक नावंदर हे गेल्या अनेक वर्षांपासून शिवसेनेचे एकनिष्ठ कार्यकर्ते म्हणून काम करत आहेत. पक्षनिष्ठा जपत त्यांनी ग्रामीण भागातील गोरगरीब, शेतकरी आणि वंचित घटकांच्या आरोग्य सेवेसाठी अहोरात्र परिश्रम घेतले आहेत. वैद्यकीय क्षेत्रातील त्यांचे योगदान आणि समाजसेवेतील सक्रिय सहभागामुळे त्यांना सर्व स्तरांतून मोठा जनाधार लाभला आहे.

परभणी व हिंगोली जिल्ह्यातील अनेक नागरिकांचे मत आहे की, सामाजिक बांधिलकी जपत जनतेच्या प्रश्नांसाठी सातत्याने संघर्ष करणाऱ्या डॉ. विवेक नावंदर यांना विधान परिषदेची संधी मिळावी. त्यांच्या उमेदवारीमुळे सर्वसामान्य नागरिक, शेतकरी आणि कष्टकरी वर्गाला विधान परिषदेत सक्षम प्रतिनिधित्व मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. त्यामुळे ठाकरे शिवसेनेच्या नेतृत्वाने डॉ. विवेक नावंदर यांना उमेदवारी देऊन त्यांच्या कार्याची दखल घ्यावी, अशी मागणी विविध स्तरांतून होत आहे.

*सर्वसामान्य नागरिकांसाठी झटणारा असा शिवसैनिक अवलिया परभणीत शहरात एकच*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *