खान्देश प्रवासी असोसिएशन धरणगाव व विक्रम ग्रंथालय व वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिर संपन्न

धरणगाव प्रतिनिधी / विनोद रोकडे
धरणगाव येथील विक्रम ग्रथालय व वाचनालय येथे रेल्वे D ग्रुप, तिकीट कलेक्टर TC, FSSI, CRPF&FCI एकूण 1 लाख 3000 जागांच्या भरतीसाठी विविध क्षेत्रातील तज्ज्ञांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यात प्रामुख्याने
प्रा श्री आर एन महाजन सर, (अध्यक्ष विक्रम ग्रंथालय व वाचनालय, धरणगाव)
मा.श्री महेंद्र सूर्यवंशी सर (तहसीलदार धरणगाव)
श्री संतोष पवार साहेब (APIधरणगाव पोलीस स्टेशन) मा.श्री दिनेश पाटील सर (STI खेडी ता अमळनेर)
श्री चिंतामणजी पाटील (उपाध्यक्ष-विवेकानंद शिक्षण प्रसारक संस्था धरणगाव)
स्टेशन मॅनेजर श्री किर्तीवंत जगताप साहेब, जळगांव
स्टेशन मॅनेजर श्री विजय पाटील साहेब,पाचोरा
श्री समाधान महाजन सर, धरणगाव, (CISF अधिकारीIGI इंटरनॅशनल एअरपोर्ट दिल्ली)
खान्देश प्रवासी असोसिएशन, धरणगाव कडून डी ग्रुप, तिकीट कलेक्टर, रेल्वे भरतीचे विविध पुस्तक संच विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करीत विक्रम वाचनालयास दिली भेट
आजचे युग हे स्पर्धेचे युग आहे यात स्पर्धा परीक्षांचे महत्त्व वाढले असून विविध पदासाठी भरती निघालेल्या आहेत (एकूण 1 लाख 3 जागा) आपल्या भागातील विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात व स्पर्धा परीक्षांच्या मार्फत त्यांची निवड व्हावी व खान्देशाचे नाव देशात उंचवावे या उद्देशाने हे शिबिर विक्रम ग्रंथालय व वाचनालय येथे आयोजित करण्यात आलेले होते त्यासाठी स्पर्धा परीक्षा देणारे परिसरातील 200 विद्यार्थी, विद्यार्थिनी यांनी उपस्थित राहून लाभ घेतला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बापूसो प्रा.आर एन महाजन सर हे होते आ. महाजन सर यांनी स्पर्धा परीक्षेसाठी वाचनाचे महत्त्व, सामाजिक दबाव, डिप्रेशनने होणाऱ्या आत्महत्या हा पर्याय नसून विद्यार्थ्यांनी खचून न जाता त्यातून कसा मार्ग काढावा याविषयी मार्गदर्शन केले व विक्रम ग्रंथालय व वाचनालय कसे उभारले याबद्दल माहिती दिली तसेच मा. तहसीलदार श्री महेंद्र सूर्यवंशी सर यांनी विद्यार्थ्यांना विविध विषयांसंदर्भात कसा अभ्यास करावा व टाईम मॅनेजमेंट कसे करावे याबद्दल विस्तृत मार्गदर्शन केले,
आ. एपीआय श्री. संतोष पवार साहेब यांनी चालू घडामोडी,इतिहास, इ.कसा अभ्यास करावा व त्यानंतर ग्रुप डिस्कशनच्या माध्यमातून कमी वेळात चर्चेतून अधिका अधिक ज्ञान कसे संपादन करावे हे मार्गदर्शन केले, व एसटीआय STI श्री दिनेश पाटील साहेब यांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत उपलब्ध साधनाच्या माध्यमातून कसा अभ्यास करावा असे विस्तृत माहिती देत आपला एस टी आय STI पदा पर्यंत जीवन प्रवास सांगितला, तसेच श्री विजय पाटील सर स्टेशनमॅनेजर पाचोरायांनी रेल्वे भरती उदा. डी ग्रुप, तिकीट कलेक्टर विषयी मार्गदर्शन केले, व श्री किर्तीवंत जगताप सर स्टेशन मॅनेजर जळगाव यांनी रेल्वे भरती विषयी डी ग्रुप तिकीट कलेक्टर व इतर या परीक्षेविषयी एक्झाम नोटिफिकेशन पासून ते निकाल लागण्यापर्यंत विविध विषयांचा कसा अभ्यास करावा, काय काळजी घ्यायला हवी, तसेच रेल्वेच्या डिपार्टमेंटल एका पदावरून दुसऱ्या उच्च पदावर परीक्षेच्या माध्यमातून कसे जावे कोणती शाखा निवडावी उदा. वर्कशॉप इ.व त्यातील बारकावे व टाइम मॅनेजमेंट कसे करावा याविषयी मार्गदर्शन केले व सी आय एस एफ, आय जी आय इंटरनॅशनल एअरपोर्ट दिल्ली येथे कार्यरत असलेले धरणगाव येथील श्री समाधान महाजन सरयांनी विविध विषया अभ्यास कसा करावा उदा. गणित विषयाची भीती कशी घालवावी, तसेच विद्यार्थ्यांनी प्रथम निश्चित करावे की आपणास केंद्राच्या परीक्षा द्यायच्या आहे की राज्याच्या कारण दोघांच्या सिल्याबस मध्ये खूप फरक आहे व त्यानुसारच आपली पुढील वाटचाल करावी असे विद्यार्थी,विद्यार्थिनींना विस्तृत मोटिवेशनल मार्गदर्शन केले, समाधान महाजन सर यांनी तिरंगा अकॅडमी मोठा माळीवाडा धरणगाव येथे सुरू केली आहे व त्या माध्यमातून त्यांचे जवळपास 15 ते 20 विद्यार्थी BSF, CRPF, ARMY येथे भरती झालेले आहेत. आभार प्रदर्शन खान्देश प्रवासी असोसिएशनचे, धरणगाव अध्यक्ष श्री कमलेशदादा तिवारी यांनी केले व सूत्रसंचालन श्री प्रतीक जैन, खजिनदार खान्देश प्रवासी असोसिएशन,झेड आर यू सी सी मेंबर पश्चिम रेल्वे मुंबई यांनी केले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी खान्देश प्रवासी असोसिएशनचे, सचिव श्री श्रेयास जैन,सहसचिव ऍड नंदन पाटील, उपाध्यक्ष -चंद्रकांत भावसार सदस्य- श्री नारायणजी महाजन,श्री प्रशांतजी भाटिया, श्री दिनेश भाऊ पाटील, श्री कन्हैया भाऊ रायपुरकर, श्री संभाजी सोनवणे, व श्री जतिनजी नगारीया, तसेच विक्रम ग्रंथालय व मोफत वाचनालय सर्व संचालक व व्यवस्थापक श्री भगवानजी कुंभार यांनी अथक परिश्रम घेतले.