श्रीकृष्ण जन्माष्टमी महोत्सव 2022 स्व. मुकुंदराव पनशिकर सभागृहात उत्साहात संपन्न
धरणगाव – यावर्षी पहिल्यांदा धरणगाव येथे इस्कॉन कडून श्रीकृष्ण जन्माष्टमी महोत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला महा अभिषेक ,त्यानंतर किर्तन नृत्य, फॅन्सी ड्रेस, कथा , या सर्व सांस्कृतिक कार्यक्रमांचा समावेश होता. कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती माननीय चैतन्य जीवन प्रभुजी व पार्थसारथी प्रभुजी (BE.electrical ,आणि प्राचार्य पंढरपूर इन्स्टिट्यूट ऑफ हायर एज्युकेशन) त्यांची होती. कार्यक्रमाला धरणगाव वासियांकडून भरपूर असा प्रतिसाद मिळाला व भरपूर संख्येने धरणगाव रहिवासी कार्यक्रमाला उपस्थित होते.
श्रीकृष्ण जन्माष्टमी महोत्सव अतिशय हरसुल्ला साथ 22 -08 2022 रोजी येथे पार पडला. कार्यक्रमाचे नियोजन अतिशय सुंदर पद्धतीने माननीय श्री गणेश ठाकूर सर, माननीय श्री आनंदराव पवार सर, माननीय श्री गोपाल चौधरी सर यांनी केले.
आणि आलेल्या सर्व भाविक भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. व आरतीने कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नियोजकांनी परिश्रम घेतले.