धानोरा येथे 453 लाभार्थ्यांच्या उपस्थितीत मोफत आरोग्य तपासणी शिबीर उत्साहात संपन्न

सुनने के लिए यहां क्लिक करें

चोपडा प्रतिनिधी – ललित कोळी

रोटरी क्लब जळगाव आणि गांधी रिसर्च फाउंडेशन, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 6 ऑगस्ट 2026, गुरुवार रोजी धानोरा ता. चोपडा येथील सुर्यवंशी गुजर समाज सतपंथ मंदिर येथे भव्य मोफत आरोग्य तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले होते.
शिबीराला परिसरातील धानोरा, पंचक, मोहरद, पारगाव, चिंचोली, देवगाव, खोरगाव अडावद इ. गावातील महिला, पुरुष, ज्येष्ठ नागरिकांनी मोठ्या संख्येने प्रतिसाद दिला. एकूण 453 महिलांनी व पुरुषांनी या शिबीराचा लाभ घेतला.
शिबीरात महिलांसाठी आणि किशोरवयीन मुलींसाठी विशेष मोफत हिमोग्लोबिन तपासणी, औषध वाटप आणि आरोग्य समुपदेशन
सर्वांसाठी मोफत दंत तपासणी आणि डोळे तपासणी
विशेष सुविधा गरजू रुग्णांसाठी मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीराचे आयोजन
मान्यवरांची उपस्थिती शिबीराच्या उद्घाटन प्रसंगी रोटरी क्लब जळगाव चे अध्यक्ष ऍड. श्री. हेमंत भंगाळे, मानद सचिव *श्रीमती स्वाती ढाके, डॉ. पराग जहागीरदार, डॉ. तुषार फिरके, डॉ. काजल फिरके, रोटे. संदीप शर्मा, डॉ. माधुरी कासट, डॉ. हर्षदा पाटील, डॉ. ज्योती चौधरी, डॉ. पवन बजाज, डॉ. हर्षवर्धन जोशी हे उपस्थित होते.
तसेच श्री. विजय जोशी, श्री. योगेश गांधी, श्री. सुबोध सराफ, राकेश चव्हाण, श्री. सुनील नानकर, सतपंथी मंदिर सेवा समितीचे श्री. विजय महाराज, श्री. गजानन चौधरी, श्री. सुरेंद्र महाजन, अध्यक्ष श्री. प्रदिप महाजन, श्री. वासुदेव महाजन उपस्थित होते.
गांधी रिसर्च फौंडेशन तर्फे श्री.गिरीश कुलकर्णी, श्री. सुधीर पाटील, श्री. प्रशांत सूर्यवंशी, श्री. चंद्रकांत चौधरी, श्री. विक्रम अस्वार यांनी शिबीराच्या पुर्वतयारी व आयोजनात मोलाचे सहकार्य केले.
गावकऱ्यांनी शिबीराबद्दल समाधान व्यक्त केले आणि अशा प्रकारचे आरोग्य शिबीर वेळोवेळी घ्यावेत अशी मागणी केली. शिबीर यशस्वी करण्यासाठी रोटरी क्लब, गांधी रिसर्च फाउंडेशन आणि सतपंथ मंदिर सेवा समितीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें