गुन्हेगारीजळगांव जिल्हा

Breaking News : चाळीसगाव शहर पोलिस ठाण्यातील सहाय्यक फौजदारासह पोलिस नाईक लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात

जळगाव – जिल्ह्यातील चाळीसगाव शहर पोलिस स्थानकातील सहाय्यक फौजदार आणि पोलिस नाईक या दोघांना ४ हजाराची लाच स्वीकारली म्हणून लाचलुचपत विभागाने यशस्वी सापळा रचत आज मंगळावर रोजी आपल्या जाळ्यात ओढले आहे.   

तक्रारदार यांच्या मुलीने चाळीसगाव शहर पोलीस स्टेशन येथे त्यांचे सासरच्या मंडळी विरुद्ध गु.र.नं.०११३/२०२२ भादवि कलम-४९८ अ व इतर कलमान्वये दि.१९ मार्च रोजी रोजी गुन्हा दाखल केला आहे. सदर गुन्ह्याच्या कागदपत्रांमध्ये मदत करू असे सांगून चार्जशीट लवकरात लवकर पाठवुन गुन्ह्यात मदत करण्याच्या मोबदल्यात तक्रारदार यांचेकडे अनिल रामचंद्र अहीरे, वय-५२, सहा.फौजदार, नेमणूक चाळीसगाव शहर पोलीस स्टेशन वर्ग-३, रा.वैष्णवी पार्क, चाळीसगांव. ता.चाळीसगाव जि.जळगांव आणि शैलेष आत्माराम पाटील, वय-३८,पोलीस नाईक, नेम-चाळीसगाव शहर पोलीस स्टेशन वर्ग-३, रा.चाळीसगांव. ता.चाळीसगाव जि.जळगांव यांनी पंचासमक्ष ४००० /- रुपये लाचेची मागणी केली व शैलेश पाटील यांनी त्यास प्रोत्साहन दिले व सदर लाचेची रक्कम दोन्ही कर्मचारी हजर असतांना अनिल अहिरे यांनी स्वतः चाळीसगाव शहरातील सिग्नल पाईंटजवळील एका चहाच्या टपरीवर पंचासमक्ष स्वीकारली म्हणून गुन्हा या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सापळा यशस्वी करणेकामी जळगाव लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उप अधीक्षक शशिकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक संजोग बच्छाव, पोलिस निरीक्षक एन.एन.जाधव, स.फौ.दिनेशसिंग पाटील, स.फौ.सुरेश पाटील, पोहेकॉ.अशोक अहीरे, पोहेकॉ.सुनिल पाटील, पो.हे.कॉ.रविंद्र घुगे, पो.हे.कॉ. शैला धनगर, पोना.मनोज जोशी, पो.ना.जनार्धन चौधरी, पो.ना.सुनिल शिरसाठ, पो.कॉ.प्रविण पाटील, पो.कॉ.महेश सोमवंशी, पोकॉ.नासिर देशमुख, पो.कॉ.प्रदीप पोळ यांच्या पथकाने सदर कारवाई केली आहे.

लाच लुचपत विभागाने नागरिकांना आवाहन केले आहे कि, कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी कींवा त्यांच्या वतीने खाजगी इसमाने त्यांचे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी लाचेची मागणी केल्यास लाचलुचपत विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय आवार, जळगाव. दूरध्वनी क्र. ०२५७ – २२३५४७७ मो.क्रं. ८७६६४१२५२९ , टोल फ्रि क्रं. १०६४ यावर संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *