GSA स्कुलमध्ये टिळकांच्या जयंतीनिमित्त स्पॉट ड्रॉईंग कॉम्पिटीशन…
धरणगाव – येथील गुड शेपर्ड इंग्लिश मिडियम स्कुलमध्ये बाळ गंगाधर टिळकांच्या जयंतीनिमित्त माल्यार्पण करण्यात आले तसेच स्पॉट ड्रॉईंग कॉम्पिटीशन घेण्यात आली.
सर्वप्रथम शाळेच्या प्राचार्या चैताली रावतोळे यांच्या हस्ते टिळकांच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले. शाखा व्यवस्थापक जगन गावित व मुख्याध्यापिका नाजनिन शेख यांनी प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करण्यात करण्यात आली. शिक्षिका नाजुका भदाणे यांनी टिळकांचे जीवनकार्य व स्वातंत्र्याच्या आंदोलनाची माहिती दिली. तद्नंतर कलाशिक्षिका पूनम कासार व शिरीन खाटीक यांच्या मार्गदर्शनाखाली स्पॉट ड्रॉईंग कॉम्पिटीशन घेण्यात आली. या स्पर्धेत विद्यार्थांनी विविध विषयांवर चित्र काढले व सुंदर रंग भरले. स्पॉट ड्रॉईंग कॉम्पिटीशन मध्ये सर्व विद्यार्थी विद्यार्थिनींनी उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदवला. कार्यक्रमाला जेष्ठ शिक्षिका भारती तिवारी, अनुराधा भावे, रमिला गावित, स्वाती भावे, हर्षाली पुरभे, ग्रीष्मा पाटील, गायत्री सोनवणे, सपना पाटील, सुनिता भालेराव, पुष्पलता भदाणे, लक्ष्मण पाटील हे शिक्षकवर्ग तसेच सरला पाटील, शितल सोनवणे, इंद्रसिंग पावरा, अमोल पवार हे शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन नाजुका भदाणे यांनी केले.