Jalgaon – धरणगाव नगरपालिकेवर २० दिवसांपासून पाणी पुरवठा नसल्याने महिलांचा एल्गार
धरणगाव येथील पिल्लू मस्जिद परिसरातील महिलांनी आज सोमवार रोजी नगरपालिकेवर एल्गार पुकारला. गेल्या २० दिवसांपासून पाण्याचा पुरवठा होत नसल्याने महिलांनी यावेळी संतप्त भावना व्यक्त केल्या. प्रत्येक वेळेला आमच्या भागावर अन्याय होतो. सध्या रमजान महिना सुरु असून आमचे रोजे सुरु असतांना या दिवसांमध्ये देखील आम्हाला भीषण पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. गेल्या पाच वर्षात आमच्या भागातील नगरसेवकाने आमच्याकडे ढुंकून देखील बघितले नसल्याची ओरड देखील यावेळी महिलांनी बोलून दाखविली.
नगरपालिकेत तक्रार मांडण्यासाठी आम्ही आज आलो असता आमचे गाऱ्हाणे देखील ऐकूण घेण्यास याठिकाणी कुणीही नसल्याचे यावेळी त्यांनी म्हटले. यासंदर्भात मुख्याधिकारी जनार्दन पवार यांची प्रतिक्रिया घेतली असता अश्या कुठल्या महिला नगरपालिकेत आल्या असल्याची माहिती मला नाही. तसेच सध्या मुख्य जल वाहिनी फुटलेली असल्याने ती दुरुस्तीचे काम सध्या सुरु असल्याची माहिती त्यांनी दिली.
यावेळी महिलांनी नगरसेवकाने बोरिंग लावली मात्र ती काही दिवस चालली व नंतर बंद पडली बोअर करून कुठलाही फायदा झाला नाही तर मग बोअरिंग केलीच का ? असा सवाल देखील या महिलांनी केला ?