ताज्या बातम्या

अकलुज – पत्रकारांनी आरोग्याची काळजी घेणे गरजेचे : डाॕ.एम.के.इनामदार

अश्विनी हाॕस्पिटल आणि माळशिरस तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने पत्रकारांची मोफत आरोग्य तपासणी

अकलुज – लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेला पत्रकार हा समाजासाठी सतत धावपळ करीत असतो.समाजासाठी काम करीत असताना आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करीत असल्याने भविष्यात मोठ्या आजारांचा धोका होवु शकतो.तो धोका टाळुन दिर्घकाळ  समाजसेवा घडण्यासाठी पत्रकारांनी आपल्या आरोग्याची योग्य वेळी काळजी घेण्याची नितांत गरज असल्याचे मत सोलापुर जिल्ह्यातील प्रसिध्द ह्दय रोग तज्ञ व अकलुज येथील अश्वानी हाॕस्पिटलचे संस्थापक डाॕ.एम.के.इनामदार यांनी व्यक्त केले.जागतिक आरोग्य दिनाचे औचित्य साधुन अश्विनी हाॕस्पिटल आणि माळशिरस तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने माळशिरस  तालुक्यातील पत्रकारांची मोफत आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.त्यावेळी डाॕ.इनामदार यांनी उपस्थित बहुसंख्य पत्रकांरांना मोलाचे मार्गदर्शन केले.पुढे बोलताना डाॕ.एम.के.इनामदार यांनी पत्रकारांना काम करताना येणार्या समस्या आणि जडणारे आजार व उपचार याविषयी माहिती दिली.पत्रकार मोफत तपासणी शिबीराचे हे चौथे वर्ष असुन दरवर्षी करण्यात येणार्या या तपासणीत ई.सी.जी.रक्तातील सर्व घटक ,रक्तातील साखर तपासली जाते. आज झालेल्या या तपासणीत  तालुक्यातील दैनिक,साप्ताहिकांच्या 40  प्रतिनिधींनीची तपासणी मोफत करण्यात आली.यावेळी मराठी पत्रकार संघटनेचे अध्यक्ष मनोज गायकवाड,जेष्ठ पत्रकार चंद्रकांत कुंभार,मिलींद गिरमे,अशोक सिदवाडकर,गहीनीनाथ वाघंबरे,भारत मगर,संजय खरात,एम.एम.शेख,शहाजन अतार या जेष्ठांसह आनेक पत्रकारांची तपासणी केली.सदरची तपासणी यशस्वी करण्यासाठी डाॕ.आनंद मस्के,डाॕ.अतुल जोशी,शैलेश कुलकर्णी ,संदेश पानसरे,विनोद देवकुळे,सुरज सरवदे,तमन्ना शेखा,नितीन तिरकुंडोणे,विलास घोळवे,उदय निकम,संभाजी पाटोळे,जयसिंग थोरात,पांडुरंग अनपट यांनी परीश्रम घेतले.@ shivaji palave-9657284999

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *