आदिवासी दिनानिमित्त ना.अजित पवार गटाकडून चोपड्यात मोफत जल सेवा

चोपडा (प्रतिनिधी) लतीश जैन
चोपडा – आदिवासी दिनानिमित्त ना.अजितदादा पवार यांचा गटाकडून छत्रपती शिवाजी महाराज चौकात आज रोजी प्रत्येक आदिवासी बांधवांना मोफत जल सेवा पुरविण्यात आली जवळपास १० हजार बॉटल २०० ml. जलसेवा पुरविण्यात आली. यावेळी पोलीस कर्मचारी, पत्रकार, होमगार्ड, व सामाजिक कार्यकर्त्यांनीही लाभ घेतला यावेळी माजी राष्ट्रवादी युवकचे जळगांव जिल्हा अध्यक्ष सुनील पाटील (वाळकी,चोपडा)आदिवासी दिनाचे औचित्य साधुन राष्ट्रवादी काँग्रेस चोपडा(अजित दादा पवार) तर्फे हजारो आदिवासी बांधवाना मोफत पिण्याच्या पाण्याच्या बॉटल वितरण केले.ह्या प्रसंगी जिल्हा बँक चे संचालक घनश्याम अग्रवाल व कृ.उ.बाजार समिती चे सभापती नारायण पाटील, चो. सा.का.संचालक निलेश पाटील, जिल्हा दुध संघाचे माजी संचालक ए. डी. रावसाहेब ,अडव्होकेट दिनेश वाघ,,तुकाराम बापु, सचिन सांगोरे,आसिफ भाई,तुकाराम पाटील,चंद्रकांत भोई, व इतर प्रमुख पाहुणे उपस्थित होते.