महाराष्ट्र

खाज्याजी नाईक स्मृती संस्थेतर्फे भिल्ल समाज सामुहिक विवाह सोहळा उत्साहात संपन्न

धरणगाव – येथील क्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मृती संस्थेतर्फे भिल्‍ल जनजातीचा सामुहिक विवाह सोहळा आनंदी वातावरणात व जल्लोषात संपन्न झाला. यावेळी परिसरातील 35 जोडपे विवाहबद्ध झाले. एन. बी. कॉटेक्स (कॉटन जीनींग) धरणगाव या विवाहस्थळी सकाळी नऊ वाजेपासून पूजा विधीला सुरुवात झाली. गायत्री परिवार जळगाव येथून 40 महिला सेवेकरी व गायत्री परिवारातील विवाह सोहळ्याचे संचालन करणारे गुरुजी व संगीतमय मंत्रोच्चाराने भारावून टाकणारी देव मंचावरील गुरुजींच्या मंत्रोच्चारात , भारतीय समाजातील वैदिक विधी आणि परंपरेनुसार पूर्णपणे गायत्री महायज्ञाने  सोहळा अधिक उत्साही व संस्कारसंपन्न वातावरणात पार पडला.             

या सोहळ्याला नवरदेव नवरी अकरा वाजेपर्यंत उपस्थित होऊन लग्न विधीला सुरुवात झाली. वैदिक पद्धतीने  सर्व संस्कार पार पडून विवाह सोहळा संपन्न झाला. या सोहळ्याला संत मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते पूजनीय संत महामंडलेश्वर १००८ ह.भ.प. भगवान बाबा धरणगाव, मा.योगी हिरानाथजी महाराज शितलनाथबाबा मठ गोरगावले,मा. खानदेशभूषण  रुपचंदजी महाराज औरंगपूर,मा. योगी मंगलनाथजी महाराज बदरखे मारुती मंदिर टोळी, मा.प्रकाश महाराज नारायणी आश्रम, राधाकृष्ण मंदिर सत्रासेन मा.हड्सनजी महाराज, नरवाडे, मा.लोटन महाराज आडगाव आश्रम तसेच विभाग संघचालक मा.श्री राजेश आबा पाटील , मा. तालुका संघचालक मोहन जी चौधरी, विश्‍व हिंदू परिषदेचे प्रांत सहमंत्री श्री ललित भाऊ चौधरी आदी उपस्थित होते. सोहळ्यास खास करून उपस्थित जळगावचे आमदार माननीय श्री राजू मामा भोळे तसेच धरणगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मा.श्री राहुल खताड साहेब विशेष उपस्थित होते .                                   

या सोहळ्याचे प्रेरणास्थान पूजनीय श्री महावीर प्रसादजी तापडिया संचालक, सुप्रीम इंडस्ट्रीज जळगाव नातू मा. सत्यनारायणजी डागा समवेत पणतू  मा. श्री मनोजजी डागा खास करून उपस्थित होते . माननीय महावीर प्रसादजी तापडिया ज्यांचे सामाजिक जीवनात प्रचंड योगदान आहे,दातृत्व शक्ती त्यांच्या जीवनाचा एक अविभाज्य अंग आहे त्यामुळे संस्थेला हा सोहळा पार पाडण्यास मदत झाली सोबतच एन बी कॉटेक्स कॉटन जिनिंगचे मालक मा.हरीशभाई जानी यांनीही आपली जीन सर्व सुविधांसह उपलब्ध करून दिली तसेच प्रत्येक नवरदेव व नवरीस ड्रेस व साडी सप्रेम भेट दिली.                             

शहर व परिसरातील अनेक दात्यांनी विवाह सोहळ्यास यथाशक्ती मदत करून या सोहळ्याच्या यशस्वीतेत आपले योगदान आर्थिक व वस्तूरूपात दिले.सोहळ्याचा परिसर आकर्षक रांगोळ्यांनी व नर्सरी ने सजवला होता. वाजंत्री बँड वाजून येणाऱ्या वधू-वरांचे व वऱ्हाडी मंडळींचे स्वागत करण्यात येत होते. याप्रसंगी उपस्थित कार्यकर्तेही पाहुण्यांसोबत उत्साहात नृत्य करत होते.जेवणाची उत्तम व्यवस्था होती व जेवणाचा स्वाद आलेली वऱ्हाडी मंडळी घेत होती. 

सकाळपासूनच शहरातील प्रतिष्ठित मंडळी व संस्थेचे पदाधिकारी सपत्नीक पूजेसाठी बसली होती. त्यामुळे वातावरण अतिशय भारावून टाकणारे  होते. संस्थेतर्फे विवाह नोंदणीच्या वेळेसच नवरदेवास दोन ड्रेस, ड्रेस शिलाई साठी पैसे , बूट व दहा हजार रुपये चेक द्वारा मदत देण्यात आली. तसेच नवरीस महावस्त्र, शिलाई साठी पैसे, चप्पल,सोन्याचे मंगळसूत्र, सोन्याची नथ,चांदीच्या साखळ्या व बेले तसेच पाच हजार रुपयांची मुदत ठेव पावती देण्यातआली. यावेळी संस्थेतर्फे नवदांपत्यांना संसारोपयोगी वस्तूंचे वाटप करण्यात आले. आशीर्वचन घेऊन व आपापले साहित्य घेऊन वऱ्हाडी मंडळी आपापल्या घराकडे रवाना झाली.                   

यावेळी पाहुणे मंडळींनी येणारे रस्ते व परिसर गर्दीने फुलून गेला होता. अनेक खाजगी स्टॉल्सही लावले होते स्वयंसेवक व कार्यकर्त्यांनी आपापल्या समितीची व्यवस्था चोख पार पाडल्यामुळे सोहळा उत्तम रीतीने पार पडला. विवाह सोहळा संपन्नते बद्दल जनजाति बांधवांनी कृतज्ञता व्यक्त करताना सांगितले की आजच्या काळात वैयक्तिक लग्न करताना होणारा अनाठायी खर्च,  वेळेचा अपव्यय, विवाहातील मानापमान या सर्व गोष्टींना तिलांजली देऊन संस्थेने एक नवा पायंडा उभारून आमचा संसार उभा केला त्याबद्दल भिल्ल समाजातील ज्येष्ठ श्रेष्ठ व्यक्ती व तरुणांनी आदर्श विवाह सोहळ्या बद्दल समाधान व्यक्त केले.       

या सामुदायिक विवाह सोहळा समितीचे प्रमुख श्री सोमनाथ भिल सोबत समितीचे सदस्य श्री अरुण सोनवणे,संस्थेचे अध्यक्ष भाईदास सोनवणे, उपाध्यक्ष यशवंत कुवर व संस्थेचे पदाधिकारी श्री सुखदेव सोनवणे, श्री संजय महाराज सोनवणे,  शिवदास भिल, प्रभाकर वाघ व शांताराम जाधव आदींनी विवाह जुळवण्या संदर्भात गावोगावी वस्तीमध्ये संपर्क करून विवाह सोहळा पार पाडण्यासाठी अथक परिश्रम घेतले. शेवटी संस्थेच्या वतीने दात्यांचे,येणार्‍या पाहुणे मंडळींचे अतिथींचे,कार्यकर्त्यांचे विवाह सोहळयास मदत करणाऱ्या साऱ्यांचे आभार मानून कृतज्ञता व्यक्त केली.

Leave a Reply

Your email address will not be published.