जळगांव – अमुर्त पेंटींग प्रदर्शनाचे थाटात उद्घाटन, चित्रातून वेगळा आनंद मिळतो : अशोक जैन
जळगाव दि.25 प्रतिनीधीv: स्व. पद्मश्री डॉ. भवरलालजी जैन यांच्या पुण्यतिथी निमित्त चित्रकार व आर्टिस्ट शिवम संजीव हुजुरबाजार याच्या पेंटींग चित्र प्रदर्शनाचे शनिवारी जैन उद्योग समुहाचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या हस्ते उद्घाटन झाले. शिवम ने रेखाटलेल्या कलाकृतीचे त्यांनी यावेळी कौतुक केले.
25 ते 28 फेब्रुवारी पावेतो वसंत वानखेडे आर्ट गॅलरी, भाऊंचे उद्यान, काव्य रत्नावली चौक येथे हे प्रदर्शन भरविण्यात आले आहे. आर्टिस्ट शिवम हुजुरबाजार यांचे जळगाव, पुणे, मुंबई येथे 9 चित्रप्रदर्शने झाली असून नेहरू आर्ट गॅलरी वरळी, जहांगीर आर्ट गॅलरी मुंबई येथेही पेंटींगचे प्रदर्शन झालेले आहे. या अमुर्त पेंटींग प्रदर्शनाचे उद्घाटन जैन उद्योग समुहाचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या हस्ते झाले.
28 फेब्रुवारी पर्यंत हे प्रदर्शन खुले असेल. सर्वांनी चित्र प्रदर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजन समितीच्या वतीने करण्यात आले आहे. यावेळी डॉ. संजीव हुजूरबाजार, जळगाव जनता सहकारी बॅकेच्या संचालिका आरतीताई हुजूरबाजार, कविवर्य ना.धो.महानोर, चित्रकार तरूण भाटे आदी उपस्थित होते. यावेळी शिवमने रेखाटलेल्या कलाकृतींचे अशोक जैन यांनी कौतुक केले. आजचे हे चित्रप्रदर्शन वेगळे आहे.अनेक प्रदर्शनांचे आपण आतापर्यंत उद्घाटन केले मात्र शिवमची ही कलाकृती वेगळी व लक्षवेधी असल्याचे ते यावेळी म्हणाले. प्रत्येक कलाकृतीतून काहीतरी वेगळे मिळते असे चांगले चित्रकार येथील मातीतून घडले याचा आपणास अभिमान असल्याचेही अशोक जैन म्हणाले. या उपक्रमास नागरिकांनी भेट द्यावी असे आवाहन त्यांनी केले.सायंकाळी हे चित्रप्रदर्शन पहाण्यासाठी गर्दी झाली होती.