ताज्या बातम्या

जळगांव : तहसिल कार्यालय धरणगाव येथे जागतिक ग्राहक हक्क दिन उत्साहात साजरा

धरणगाव : तहसिल कार्यालय, धरणगाव येथे दि. १५/०३/२०२३ रोजी “जागतिक ग्राहक हक्क दिवस” चे आयोजन करण्यात आलेले होते. सदर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मा.श्री. लक्ष्मण सातपुते, प्रभारी तहसिलदार तथा निवासी नायब तहसिलदार धरणगाव, प्रमुख पाहुणे मा. श्री.दिनेश तायडे, जिल्हा उपाध्यक्ष, अखिल भारतीय ग्राहक पंचायत,जिल्हा जळगाव, श्री.विनायक महाजन तालुका अध्यक्ष ग्राहक पंचायत श्री.सतीश असर सचिव ग्राहक पंचायत, तसेच धरणगाव स्वस्त धान्य दुकानदार संघटना अध्यक्ष श्री.जी.डी.पाटील,उपाध्यक्ष श्री.प्रभाकर अण्णा पाटील उपाध्यक्ष तसेच अनेक सुजाण नागरिक व स्वस्त धान्य दुकानदार उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री.दिनेश तायडे यांनी सर्व उपस्थितांना जागतिक ग्राहक दिनाबाबतची पार्श्वभूमी कथन करुन ग्राहकांच्या हक्कांबाबत मार्गदर्शन केले. ग्राहक हा संपूर्ण अर्थव्यवस्थेचा राजा असून त्याचेवर संपूर्ण अर्थचक्र हे गतिमान आहे. ग्राहकाचे हक्क व त्यांचे संरक्षण होणे हे महत्वाचे असल्याचे त्यांनी मार्गदर्शनात प्रतिपादन केले.तसेच श्री विनायक महाजन यांनी देखील मार्गदर्शन केले व श्री. लक्ष्मण सातपुते साहेब प्रभारी तहसिलदार यांनी कार्यक्रमाचे अध्यक्षीय भाषणात ग्राहकाची फसवणूक न होण्यासाठी त्यांनी घ्यावयाची खबरदारीबाबत विस्तृत मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन श्री.राजू ओस्तवाल धरणगाव यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *