ताज्या बातम्या

जळगांव : धरणगावात नायब तहसीलदारासह कोतवाल एसीबीच्या जाळ्यात !

धरणगाव : जिल्ह्यात सुरु असलेल्या वाळू वाहतुकीला लगाम लावण्यासाठी अनेक अधिकारी तत्पर आहेत. पण काही अधिकारी वाळूमाफियाकडून लाच घेत असल्याने पूर्णपणे वाळूला कुठेही आळा बसताना दिसून येत नाही. आज लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने धरणगाव तहसील कार्यालयात कारवाई करीत नायब तहसीलदार यांच्यासह एका कोतवालाला ताब्यात घेतले आहे. यामुळे तालुक्यात एकच खळबळ उडाली होती.

धरणगाव तहसील कार्यालयात महसूल विभागात कार्यरत असलेले नायब तहसीलदार जयवंत भट व कोतवाल राहुल नवल शिरोळे नामक इसमाने तक्रारदार यास वाळू वाहतूक डंपरने सुरु राहू देण्यासाठी ३० हजाराची लाच मागितली होती. ती तडजोडअंती २५ हजार रुपये निश्चित झाली होती. पण तक्रारदाराने जळगाव येथील एसीबीकडे याची तक्रार केली होती. या प्रकरणी आज गुरुवार रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास एसीबीचे डीवायएसपी शशिकांत पाटील यांनी त्यांच्या पथकासह लाच घेताना कोतवालासह नायब तहसीलदार यांना ताब्यात घेतले आहे. धरणगाव तहसील कार्यालयात केलेल्या कारवाईने अधिकारी वर्गामध्ये एकच खळबळ उडाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *