जळगांव जिल्हा

जळगाव शहराचे काँग्रेसचे माजी शहर उपाध्यक्ष रईस भाई कुरेशी यांचा आम आदमी पार्टी मध्ये जाहीर प्रवेश

जळगाव – जळगाव शहर आम आदमी पार्टी कार्यालयात माजी काँग्रेस शहर उपाध्यक्ष रईस भाई कुरेशी व कार्यकर्ते यांनी जाहीर प्रवेश केला तसेच नाझीम भाई कुरेशी, आरिफ खान. मोहनराव पाटील. दिनेश धनगर. मंगेश कोळी. विलास केदार. आदींनी जळगाव शहर जळगाव महानगर कार्याध्यक्ष योगेश हिवरकर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रवेश केला यावेळी आनंद भाई शर्मा यांच्या प्रमुख उपस्थितीत सदर कार्यक्रम पार पडला.

कार्यक्रमाचे नियोजन जळगाव शहर मिडीया प्रवक्ता योगेश भोई यांनी काम पाहिले यावेळी उपस्थित कार्यकर्ते माधवराव जाधव, हेमराज सोनवणे, पवन खंबायत, दुर्गेश निंबाळकर, विक्रम कापडणीस आदी कार्यकर्ता उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *