ताज्या बातम्या

जागृत नवमतदार हेच यशस्वी लोकशाहीचे खरे शिलेदार : नितीनकुमार देवरे

पष्टाने खु.येथे रा.से.योजनेच्या शिबिरात प्रबोधन…

धरणगाव — तालुक्यातील पष्टाने खु.येथे आयोजित कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय धरणगाव यांच्या राष्ट्रीय सेवा योजना एककच्या ‘विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबिरात’ दुपारच्या बौध्दिक सत्रात “मतदान व नवयुवक” आणि “छत्रपती शिवाजी महाराज यांची स्वराज्य विषयक कल्पना” या विषयांवर प्रबोधनपर व्याख्यान संपन्न झाले. कार्यक्रमाच्या सुरवातीला तालुका कार्यकारी दंडाधिकारी तथा तहसिलदार नितीनकुमार देवरे आणि सामाजिक कार्यकर्ते तथा व्याख्याते लक्ष्मणराव पाटील यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. आलेल्या अतिथींचा रा.से.यो. युनिटतर्फे स्वागतगीत, शाल, ग्रंथ आणि पुष्पगुच्छ देऊन यथोचित सन्मान करण्यात आला. तहसिलदार नितीनकुमार देवरे यांनी मतदान व नवयुवक या विषयावर प्रबोधन केले. राष्ट्र विकासात नव युवकांची भूमिका अतिशय मोलाची आहे. फॉर्म ०६, फॉर्म ०७ तसेच ईव्हीएम मशीन याबद्दल प्रात्यक्षिक दाखवून माहिती दिली. सक्षम लोकशाही घडविण्यासाठी मतदार जनजागृती झाली पाहिजे तरच मतदार दिन यशस्वी रीतीने साजरा होईल. मतदान नव्हे तर मताचा मौलिक अधिकार आपण बजावला पाहिजे तरच आपला देश सक्षम राष्ट्र घडेल, असे प्रतिपादन तहसिलदार देवरे यांनी केले. व्याख्याते लक्ष्मणराव पाटील यांनी छत्रपती शिवरायांची स्वराज्य संकल्पना कशी होती?याबाबत सविस्तर माहिती दिली. ‘राज्य छोटं असलं तरी चालेल पण स्वतःच असावं’, हा शिवविचार आजच्या युवकांनी आत्मसात केला पाहिजे. आई वडिलांची सेवा केली पाहिजे, विवेकानंद व कलाम सरांच्या स्वप्नातील युवक घडला पाहिजे असे प्रतिपादन, व्याख्याते पाटील यांनी केले. का.अध्यक्ष रोहित पटूने याने आपल्या मनोगतातून मान्यवरांचे ऋण व्यक्त केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी व्हर्गिस कुरियन ग्रुपचे सदस्य रोहीत पटूने तर प्रमुख अतिथी म्हणून पष्टाने खु. गावचे माजी सरपंच किशोर निकम, रा.से.यो.का.अधिकारी डॉ.अभिजित जोशी, सहा.का.अधिकारी डॉ.गौरव महाजन, महिला का.अधिकारी डॉ.ज्योती महाजन, प्रा.विश्वजित वळवी, प्रा.योगेश पाटील , धरणगाव तहसिलचे महसूल सहाय्यक पंकज शिंदे, चालक फारूक पटेल आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ.व्हर्गिस कुरियन ग्रुपच्या सदस्यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भाग्यश्री पाटील हिने तर आभार प्रदर्शन हर्षदा पाटील ने केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *