ताज्या बातम्या
जालना : घनसावंगी तालुक्यात शिक्षकाच्या मुलीने जुनी पेंन्शन गीत म्हणत चिमुकलीने घेतला संपात सहभाग
प्रतिनिधी संभाजी कांबळे, घनसावंगी
जालना – घनसावंगी तालुक्यातील शासकीय कर्मचारी बेमुदत संपावर जुन्या पेन्शन लागू करण्याच्या मागणीसाठी घनसावंगी येथे सहभागी झाले आहे. एकच मिशन जुनी पेंशन योजना लागू करण्याच्या मागणीसाठी सरकारी निरमकारी शिक्षक कर्मचारी समन्वय समिति महाराष्ट्र तालुका शाखा – घनसावंगी 14 मार्च पासुन बेमुदत संप सुरु असून महिला शिक्षक शासकीय कर्मचारी मोठ्या संख्याने उपस्थित होते. संपात तलाठी संघटनेचे अध्यक्ष, ग्रामसेवक संघटनेचे अध्यक्ष,आरोग्य संघटनेचे अध्यक्ष, शिक्षक संघटनेचे अध्यक्ष यांच्या उपस्थित सह पाठिंबा आहे. त्या संपत एका NPS ग्रस्त शिक्षकाच्या मुलीने अजिन आसिफ शेख या मुलीने पेंशन गीत गायिले. एक मिशन जुनी पेंन्शन यावर गीत म्हणत संप पुकारण्यात आले.