धरणगाव शहर

दिव्यांग मुस्लिम बांधवांना ईद निमित्त रेशन कीट वाटप

धरणगाव – येथील तहसील कार्यालया मार्फत दिव्यांग मुस्लिम बांधवांना ईद निमित्त रेशन कीट वाटप करण्यात आले. ईदचे औचित्य साधून धरणगाव तहसील कार्यालय व दिव्यांग महासंघ यांच्या संयुक्त विद्यमाने मुस्लिम दिव्यांग बांधवांना अकील रऊफ, असलम पठाण, नजराना मेहबूप, परवीन हैदर, फातेमा फत्तू, आरिफ खा यांना एका महिन्याचे रेशन किट वाटप करण्यात आले.
या प्रसंगी श्री गुलाबरावजी वाघ संजय निराधार समितीचे अध्यक्ष, तहसीलदार नितीन देवरे, दिव्यांग महासंघाचे संस्थापक अध्यक्ष माजी नगराध्यक्ष पी एम पाटील सर, चर्मकार महासंघाचे कार्याध्यक्ष भानुदास विसावे, नगरसेवक अहमद पठाण, तालुकाध्यक्ष संजय पाटील, तोसिफ पटेल, रवींद्र काबरा, राजू चौधरी, विलास पवार तसेच दिव्यांग बांधव मोठ्या संख्येत उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *