धरणगाव बाळासाहेबांची शिवसेना शहर प्रमुख पदी विलास महाजन व युवा सेना उपजिल्हा प्रमुख पदी महेंद्र उर्फ भैया महाजन
धरणगाव – येथील शिवसेनेचे कट्टर कार्यकर्ते माजी उपनगराध्यक्ष विलासभाऊ महाजन यांची धरणगाव शहर अध्यक्षपदी जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील साहेब यांच्या आदेशान्वये व युवा सेना उपजिल्हा प्रमुख पदी महेंद्र उर्फ भैया महाजन शिवसेना उपजिल्हा प्रमुख पी एम पाटील सर यांनी निवड केली,तालुका प्रमुख गजानन नाना पाटील यांनी विलास महाजन यांची शहर प्रमुख पदी निवड केली आहे. त्यांच्या निवडीबद्दल जिल्हा प्रमुख निलेशभाऊ पाटील,युवा नेते प्रतापराव पाटील यांनी त्यांच्या सत्कार केला. व विधानसभा क्षेत्र प्रमुख संजय पाटील सर, मागासवर्गीय जिल्हा प्रमुख मुकुंदभाऊ नन्नवरे,नगरपालिका गटनेते पप्पू भावे,नगरसेवक विजय महाजन,वासुदेव चौधरी, अहमद पठाण,भैय्या महाजन, मच्छिंद्र पाटील,तोसिफ पटेल,रवी महाजन,बाळासाहेब जाधव व सर्व शिवसेनेचे पदाधिकारी युवा सेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते नगरसेवक यांनी अभिनंदन केले.