धरणगाव महाविद्यालयाचे कु.देवश्री महाजन व मृणाल भावसार राज्य स्तरीय वाद विवाद स्पर्धेत प्रथम
धरणगाव : येथील कला, वाणिज्य आणि विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय मधील विद्यार्थ्यांनी स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालय, जळगाव आयोजित राज्यस्तरीय वादविवाद स्पर्धेत संघात प्रथम क्रमांक पटकाविला.सविस्तर वृत्त असे की, आज दिनांक 12 जानेवारी स्वामी विवेकानंद व आई जिजाऊ जयंती निमित्त जळगाव येथील स्वामी विवेकानंद महाविद्यालय येथेराज्यस्तरीय वादविवाद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत महाराष्ट्रातून अनेक महाविद्यालयांमधून स्पर्धक सहभागी होते. ‘ऑनलाइन शिक्षण प्रणालीमुळे विद्यार्थ्यांमध्ये स्वयंअध्यनाची सवय वाढीस लागत आहे की नाही.’ हा विषय विद्यार्थ्यांना वाद विवाद स्पर्धेसाठी देण्यात आला होता.या स्पर्धेत धरणगाव कॉलेज मधील विद्यार्थिनी कु. देवश्री महाजन व मृणाल भावसार यांनी सांघिक प्रथम क्रमांक पटकावला. रुपये ५००० व फिरता चषक व प्रशस्तीपत्र प्रदान करण्यात आले. तसेच कु. देवेश्री महाजन हिला उत्तेजनार्थ प्रथम क्रमांक मिळाला. पारितोषिक ७०० रूपये तसेच सन्मान चिन्ह, प्रशस्तीपत्र प्रदान करण्यात आले. तसेच मृणाल भावसार हिला वैयक्तिक द्वितीय क्रमांक रुपये १५०० व सन्मान चिन्ह देण्यात आले. या संघाचे प्रमुख मार्गदर्शक, आदर्श शिक्षिका सौ. आर. सी. पवार यांना सन्मान चिन्ह व प्रशिस्त पत्र देऊन गौरव करण्यात आला. कु. देवश्री महाजन ही बालकवी ठोंबरे व कूडे शाळेचे शिक्षक आर. डी. महाजन व धरणगाव महाविद्यालयाच्या प्राध्यापिका कविता महाजन यांची कन्या आहे. मृणाल भावसार ही शहरातील पेंटर दिनेश भावसार यांची कन्या आहे. विद्यार्थी, विद्यार्थिनी व संघाचे प्रमुख यांनी अथक परिश्रम, जिद्द, चिकाटी यांच्या बळावर यश प्राप्त केले. पी.आर.हायस्कूल सोसायटीच्या यशात मानाचा तुरा रोवला आहे. संस्थेचे अध्यक्ष डॉ.अरुण कुलकर्णी, उपाध्यक्ष व्ही. टी. गालापुरे, सचिव डॉ.मिलिंद डहाळे, संचालक अजय पगारिया, सर्व संचालक मंडळ, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. के. एम. पाटील, उप प्राचार्य प्रा.डॉ. ए. डी. वळवी, उपप्राचार्य प्रा. आर. आर. पाटील, पर्यवेक्षक प्रा.बी.एल.खोंडे, ग्रंथपाल प्रा. पी. आर. देशमुख, कार्यालयीन अधीक्षक प्रा.डी.जी. चव्हाण तसेच प्राध्यापक बंधू भगिनी, शिक्षकेतर बंधू यांनी विजयी विद्यार्थी विद्यार्थिनी तसेच संघाचे प्रमुख प्रा. आर. सी. पवार यांचे अभिनंदन करण्यात आले. व पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.