नायगांव तालुक्यात चार खांब जमीनीवर पडून दहा खांबाच्या विद्युत तारांची चोरी
नायगाव / प्रतिनिधी – एल.बी.रानडे
नायगाव – तालुक्यातील गडगा शिवारातील गट क्रमांक १७,१२ मधील विद्युत तारा चोरी झाल्याची घटना मंगळवारी (ता.८) रोजी मध्यरात्रीच्या सुमारास दहा खांबावरिल तीन पदरी असलेल्या विद्युत तारा कट्टरच्या साह्याने कट करुन चोरटय़ांनी लंपास केला आहे. विद्युत मोटारीचे वायर कट करुन पकड,पाने, किटक्याट अन्य साहित्य चोरटय़ांनी पळविले आहेत. बुधवारी सकाळी शेताकडे गेलेल्या शेतकऱ्यांना विधुत ताराची चोरी झाल्याचे निदर्शनास आले. या घटनेमुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.
सदरील बाब त्या शिवारातील शेतकऱ्यांनी दूरध्वनीवरून महावितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांना सांगितले असता.महावितरणाचे अधिकारी,कर्मचारी घटनास्थळी धाव घेतली.तनावा मशिनच्या साहाय्याने कट करुन चार पोल जमीनीवर पडून तारा लांबविले आहेत. या चोरी प्रकरणात चार चाकी वाहणाचा उपयोग केल्याचे समजते. तारा कट केल्या ठिकाणी दारूच्या बाटल्या हेडफोन आढळून आले आहे.रात्रीच्या अंधारात कोवळ्या पिकांत फिरून पिकांचे नुकसान चोरटय़ांनी केले आहे.
सदर प्रकरणी बुधवारी सहा वाजेपर्यंत गुन्हा दाखल झाला नव्हता.आमचे प्रतिनिधी महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना दूरध्वनीवरून संपर्क साधला असता.गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू असल्याची माहिती दिली.गडगा सह परिसरात वारंवार चोरीच्या घटना घडत असल्याने पोलीस प्रशासना बद्दल सर्वसामान्य जनतेतून नाराजी व्यक्त केली जात आहे.