ताज्या बातम्या

प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा लाभ मिळावा- महाराष्ट्र शेतकरी संघटनेचे निवेदनाव्दारे मागणी

धरणगाव (ता 22): तालुक्यातील शेतकऱ्यांना प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेअंतर्गत दोन हजार रुपये मिळत होते परंतु बऱ्याचशा शेतकऱ्यांना दोन हजार रुपयाचे हप्ते बंद झालेले आहेत तसेच काही शेतकऱ्यांचे वाटणी पडल्याने नवीन उतारे तयार झाल्याने त्या शेतकऱ्यांचे नवीन नोंदणी चे पोर्टल चालू- बंद होत असल्याने आणि नोंदणी झालीच तरी त्यांना तालुका जिल्हा स्तरावर मान्यता मिळत नाही अशा अनेक तक्रारी शेतकऱ्यांना आहेत शेतकरी तहसील कार्यालय ते कृषी कार्यालय असे हेलपाटे करत आहेत म्हणून महाराष्ट्र शेतकरी संघटनेचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष व शेतकरी नेते सुनील देवरे यांच्या नेतृत्वाखाली नायब तहसीलदार मा. लक्ष्मण सातपुते यांना निवेदन देण्यात आले. यावेळी शेतकरी नेते सुनील देवरे यांनी शेतकरींची कैफियत नायब तहसीलदार लक्ष्मन सातपुते यांना सांगितली.यावर नायब तहसीलदार लक्ष्मन सातपुते यांनी सांगितले की आपण दिलेल्या निवेदनानुसार आम्ही आपली भूमिका शासनापर्यंत आवर्जून पाठवू असे आश्वासन दिले. शेतकऱ्यांना त्यांच्या स्टेटस ला जमीन, बँक,एफटीओ,केवायसी सर्व लिंक आहे तरीही हप्ता जमा होत नाही एकीकडे शासन आपल्या दारी असे सरकार सांगत असतांना माझा शेतकरी शासनाच्या दारोदारी हिंडत आहे हे सरकारने समजून घ्यायला हवे आणि राज्य सरकार सांगत आहे की आम्ही ही शेतकऱ्यांना केंद्र सरकार प्रमाणे सहा हजार वार्षिक देऊ हे आता आम्हाला पटायला तयार नाही कारण जे मिळत होते तेच बंद केले आणि नवीन कुठे देणार असा प्रश्न आम्हा शेतकऱ्यांच्या मनामध्ये उपस्थित होतो असे मत शेतकरी नेते सुनील देवरे यांनी व्यक्त केले. तसेच शासकीय कार्यालयात एक यंत्रणा स्थापित करून त्या यंत्रणेने शेतकऱ्यांच्या सर्व प्रकारच्या समस्या समजून घेवून त्या जागेवर निराकरण करावे असे संघटनेचे धरणगाव तालुका युवा अध्यक्ष सुबोध खैरनार यांनी मत व्यक्त केले. या निवेदनावर तालुकाध्यक्ष संजय चव्हाण,युवाध्यक्ष सुबोध खैरनार, कृष्णा संदानशिव – सरपंच अहिरे खुर्द, रावसाहेब पाटील,रविंद्र पाटील,महेंद्र महाजन व तालुक्यातील संघटनेचे सदस्य व मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *