मित्राच्या मुलीवर बलात्कार करणाऱ्या चुंचाळे येथील नराधमास २० वर्षाचा कारावास
प्रतिनिधी विनायक पाटील
पिडीतेस ५० हजार रु देण्याचा अमळनेर सत्र न्यायालयाचा निकाल
चोपडा : तालुक्यातील चुंचाळे येथिल आरोपी ज्ञानेश्वर रामदास कोळी वय-45 रा.चुंचाळे, ता. चोपडा, जि. जळगांव आरोपी हा पिडीतेच्या वडिलांचा मित्र होता त्यांचे घरी नेहमी येणे जाणे असायचे पिडीता नेहमी त्याला मामा म्हणायची पिडीतेचे आई वडिल शेतकरी असल्याने ते शेतिकामासाठी शेतात गेले असताना पिडीता घरी एकटी टि.व्ही पाहत असता मामा ज्ञानेश्वर घरी आला व त्यांने पाणी मागीतले व त्यावेळेस पिडीतेच्या आई व वडिलांची सर्व चौकशी केली व त्यावेळी पिडीतेने आई व वडिल शेतात गेल्याचे सांगीतले त्यावेळी आरोपीने पिडीतेस जवळ ओढले व लाड करु लागला तेंव्हा त्याने तिचे अंगावर इकडे तिकडे हात लावु लागला त्यावेळी पिडीता ही ओरडली असता तिचा आवाज कोणलाही पैकु येवु नये म्हणुन टि.व्ही चा आवाज मोठा केला व त्यावेळी तिच्या अंगावरील सर्व कपडे काढुन तिचे सोबत बळजबरीने प्रतिकार करीत असताना देखील तिचे सोबत संबंध केले व तिस धमकी दिली की जर कोणास सांगीतले तर, मी तुला पाहुन घेइन. त्यानंतर पुन्हा चार दिवसांनी पिडीतिचे मामा हे 10.00 वाजता आले होते तेव्हा सुध्दा पिडीतेचे आई व वडिल व भाउ घरी नव्हते पिडीता हि टि.व्ही पाहत असताना आरोपी हा घरात आला व त्यांने जबरदस्तीने दरवाजा बंद केला त्यानंतर त्यांनी पिडीतेचे तोंड दाबुन पिडीतेस पलंगावर झोपवले व जबरदस्तीने पिडीतेसोबत शरिरसंबंध केलेत. आरोपीने जबरदस्तीने केलेल्या शरिरसंबंधामुळे तिन ते चार महिन्यानी पिडीतेचे अचानक पोट दुखु लागल्याने पिडीतेच्या आईने चोपडा येथील डॉ. दिपक चौधरी यांच्या दवाखान्यात नेले त्यावेळी डॉक्टरांनी, पिडीतेला दिवस गेल्याबाबत सांगीतले त्यांनतर पिडीता ही चोपडा ग्रामीण पोलिस स्टेशन येथे जावुन व त्यानंतर बालकल्याण समिती जळगांव येथे पिडीतेचे समुउपदेशन करण्यात आले. सदर घटनाकम लक्षात घेवुन चोपडा ग्रामीण पोलिस स्टेशन येथे पिडीतेच्या आईने फिर्याद दिली होती. मा. न्यायालयात आरोपी विरुध्द भा.द. वि. कलम कलम 376(1) (A),376 (3),506 व बाल लैंगिक आत्याचार संरक्षण कायदा 2012 चे कलम 3(a) 4, 5(01) (2), 6. प्रमाणे दोपारोप ठेवण्यात आला. सदर कामी. मा. जिल्हा न्यायाधीश 2 श्री. पी.आर.चौधरी साहेब यांचेपुढे सदरच्या खटल्याचे कामकाज चालले त्यात सरकारी वकील अॅड. किशोर आर. बागुल, मंगरूळकर यांनी कामकाज पाहिले सदर खटल्या एकुण 11 साक्षीदार तपासले. सदर खटल्यातील सरकार पक्षा तर्फे फिर्यादी व पिडीता तसेच वैदयकिय अधिकारी चोपडा व वैदयकिय अधिकारी जळगांव व तपासणी अधिकारी श्री संदिप आराख, यांनी तपास केला तदंनंतर मा. न्यायालयात सदर गुन्हयातिल महत्त्वाचे साक्षीदार सरकारी वकिल श्री. किशोर बागुल यांनी तपासले त्यांत दोषारोप पत्र दाखल झाल्यानंतर आरोपी व पिडीता यांचे गर्भातिल डि.एन.ऐ स्पॅम्पल रिपोर्ट आल्यावर ते आरोपीताचे डि.एन.ऐ असल्याचे नाशिक वैज्ञानिक विभाग यांनी अहवाल सादर केला. सदर अहवाल व इतर साक्षीदारांच्या साक्ष मा. न्यायालयाने ग्राहय धरुन आरोपीतास सदर खटल्यात कलम 3(a) 4, 5(1) (2), 6. प्रमाणे दोषी घरले व कलम 3(a) शिक्षा कलम 4. प्रमाणे 20 वर्षे शिक्षा तसेच 5(1) (2) शिक्षा कलम 6 प्रमाणे 20 वर्षे शिक्षा व रक्कम रुपये 50.000/- रुपये दंड सदर दंडाची रक्कम न भरल्यास एक वर्षे शिक्षा त्याच प्रमाणे मा. न्यायालयाने सदर खटल्यात पिडीतेच्या भवितव्याचा विचार करुन पिडीतेस सदर दंडाची रक्कम रुपये 50,000/- तिचे मानसिक उदरनिर्वाहा करीता देण्याचे आदेश केले असुन पुन्हा जिल्हा विधी सेवा समिती जळगांव यांचे कडेस पिडीतेस झालेल्या अत्याचारामुळे मानसिक, व शरिरिक त्रासकरीता विधीसेवासमितीकडे पिडीता फंड मागण्याबाबद देखील आदेश करुन त्या बाबत पिडीतेस देखील फंड मिळण्याकरीता न्यायानिर्णयाची प्रत सरकारी वकील श्री. किशोर बागुल यांचे मार्फत पिडीतेस देण्याचे आदेशीत केले आहे. जेणेकरुन पिडीतेसझालेल्या मानसिक व शारिरीक त्रासापोटी शासनकडुन निर्भया फंड मधुन मागणी करता येइल.सदर आरोपी त्यांचे अटकेपासुन कारागृहात होता. या कामी तपासणी अधिकारी संदिप आराख व पैरवी अधिकारी, ए.एस.आय. उदयसिंग साळुंके, व पो.हो.कॉ हिरालाल पाटील, व चोपडा शहर पोलीस स्टेशन चे पोलीस कॉ. नितीन दिलीप कापडणे व पो.कॉ.आकाश पाटील यांनी काम पाहीले. आरोपी कारागृत असल्याने वकील लावण्याची परिस्थीती नसल्याने त्यांना शासनाकडून विधी व सेवा समिती कडुन वकील नेमण्यात आले होते त्यामुळे आरोपीतांना कमीत कमी दंड करण्यात आला.