येळवट पाटी ते जुने गाव येळवट रस्त्याचे काम तात्काळ सुरु करा अन्यथा शिवसेना स्टाईल आंदोलन

औसा प्रतिनिधि / जीवन जाधव
औसा तालुक्यातील येळवट पाटी ते जुने गाव येळवट अर्धवट सोडलेला रस्त्याचे काम तात्काळ सुरू करा अन्यथा शिवसेना स्टाईल ने आंदोलन करण्यात येईल असा ईशारा सहकार सेना जिल्हा अध्यक्ष किशोर जाधव यांनी दीला.
औसा तालुक्यातील येळवट पाटी ते जुने गाव येळवट या रस्त्याचे काम गेल्या सहा महिन्यांपासून बंद आहे. कंत्राटदार हे काम सोडून पसार झाला आहे. सदरील रस्ता त्याने खोदून त्यात खडी काम केले आहे व ती खडी आता उखडून गेली आहे. उखडून गेलेल्या खडीमुळे या रस्त्यावरून शेतकरी नागरिक व वाहनधारकांना ये-जा करणे कठीण झाले आहे. नागरिकांचे व प्रवाशांचे मोठे हाल होत आहेत. शिवाय अपघातांचे प्रमाण या रस्त्यावर वाढले आहे. असे असतानाही याकडे दुर्लक्ष केले जात आहे तसेच तालुक्यातील अनेक गावांना जोडणाऱ्या रस्त्याची अवस्था गुत्तेदार आणि प्रशासनाने वाईट करून ठेवली आहे.
शिवसेना युवासेना यांचा इशारा
दरम्यान येळवटपाटी ते जुने गाव येळवट रस्त्याचे काम तात्काळ सुरू करा; अन्यथा शिवसेना स्टाईलने तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा शिवसेना सहकार सेनेचे जिल्हाध्यक्ष किशोर जाधव यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उपअभियंत्यांना शुक्रवारी एका निवेदनाद्वारे दिला आहे. तर येळवट पाटी ते जुने येळवट गाव या रस्त्याचे काम तात्काळ पूर्ण करा; अन्यथा होणार्या परीणामांना तयार राहा असा इशारा शिवसेना सहकार सेनेचे जिल्हाध्यक्ष किशोर जाधव , शिवसेना उपतालुकाप्रमुख किशोर भोसले , युवासेना उपतालुकाप्रमुख सचिन मोरे , शिवसेना सोशल मीडिया सचिव श्रीहरी उत्के यांनी दिला आहे.