रावेर तालुक्यातील वाघोड येथे श्रीमद भागवत कथा व अखंड हरिनाम नामसंकिर्तन सोहळा

रावेर (प्रतिनिधी) – कमलेश पाटील
रावेर तालुक्यातील नवसाला पावणारा मुजोंबा महाराज व श्री स्वामी कुंवरस्वामी महाराजाचा पावन भुमीत दरवर्षीप्रमाणे यंदाही धर्मनाथ बिज निमित्ताने श्रीमत भागवत सप्ताह चे आयोजन दिनांक २४ जानेवारी रविवार पासुन ते ३१ जानेवारी पर्यंत महात्मा फुले चौक असणार आहे.
मध्य प्रदेशातील ब्रम्हपूर, खडकोड येथील आंतराराष्ट्रीय कथा प्रवक्ते परमश्रध्देय भागवत भुषण ब्रजपेमी ह.भ.प.श्री कन्हैयालाल महाराज हे कथा वाचक असून दैनंदिन कार्यक्रमात सकाळी ५ ते ६ वाजेपर्यंत काकडा आरती, दुपारी १२ ते४ वाजे पर्यंत कथा वाचन व सायंकाळी ५ ते ६ वाजेपर्यत हरिपाठ आणि रात्री ८ ते १० वाजे पर्यंत किर्तन सोहळ्यात पहिल्या दिवशी एकनाथ महाराज आळंदी येथील एकनाथ महाराज, दुसऱ्या दिवशी वाघोड येथील संतोष महाराज, तिसऱ्या दिवशी चाळीसगाव येथील दत्तात्रेय महाराज,चौथ्या दिवशी विलास महाराज, पाचव्या दिवशी बारामती येथील बाळासो नाळे महाराज, सहाव्या दिवशी चाळीसगाव येथील कुशाल महाराज, सातव्या दिवशी मनवेळ येथील अंकुश महाराज, आणि आठव्या दिवशी काल्याचे किर्तन कथा वाचक कन्हैय्या जी यांचे असणार आहे, पखवाज वादक विशाल महाराज आलमपूरकर असून गायक ह.भ.प युवराज महाराज वाघोडकर, ह.भ.प विलास महाराज वाघोडकर, ह.भ.प खुशाल मी महाराज चाळीसगाव हे असणार आहे. आठव्या दिवशी काल्याचे किर्तनानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे व सायंकाळी सहा वाजेपासून नऊ वाजेपर्यंत दिंडी सोहळा व भारुडाचा कार्यक्रम करण्यात येणार आहे आयोजनासाठी समस्त भजनीं मंडळ व ग्रामस्थ परिश्रम घेत आहेत.