राष्ट्रीय पातळीवरील हेस वेल्फेअर राष्ट्रीय फाउंडेशनच्या विभागीय अध्यक्षपदी गुलाबराव पाटील यांची नियुक्ती
मुंबई : देशपातळीवर मानव अधिकार अॅंटी ड्रग्स अॅंटी करप्शन, भ्रष्टाचार निर्मूलन आणि पर्यावरण बचाव व गरीब लाभार्थी योजने अंतर्गत सामाजिक एकोपा या विषयावर आधारित राष्ट्रीय पातळीवर काम करीत असलेल्या हेस वेल्फेअर राष्ट्रीय फाउंडेशनच्या नाशिक विभागाच्या विभागीय अध्यक्षपदी पारोळा तालुक्यातील पिंपरी मोंढाळे येशिल रहिवासीस सामाजिक कार्यकर्ता व माहिती अधिकार कार्यकर्ता गुलाबराव जगन्नाथ पाटील यांची मुंबई येथे झालेल्या पदाधिकारी मेळाव्यात हेस वेल्फेअर फाउंडेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री ललितेश्वर सिंह बेदी यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देवून नियुक्त करण्यात आली.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय बापूराव ढगे पाटील यांच्यासह राष्ट्रीय उपाध्यक्ष गुरमीत सिंग तुंग, राष्ट्रीय चेअरमन मा.नीरज भल्ला, प्रदेश प्रचार प्रमुख बापूराव ढगे पाटील साहेब, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष माननीय विलासराव पवार साहेब पाटील, प्रदेश सचिव अझर पटेल साहेब, महिला प्रदेशाध्यक्ष दिपाली खान, मुंबई महिला अध्यक्ष सुभदा विचारे, विधी सल्लागार अँड.लक्ष्मण बेडेकर उपाध्यक्ष विद्या हाके, धुळे जिल्हा अध्यक्ष प्रवीण बोरसे साहेब यांच्यासह उत्तर महाराष्ट्र वरिष्ठ पदाधिकारी व कार्यकर्ते, मराठवाडा वरिष्ठ पदाधिकारी विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र सर्व पदाधिकारी आणि हैस वेल्फेअर राष्ट्रीय फाउंडेशन चे सक्रिय कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष विलास पवार साहेब यांनी तर आभार मुंबई महिला अध्यक्ष सुभदा विचारे यांनी मानले. प्रसंगी गुलाबराव जगन्नाथ पाटील यांची निवड झाल्याबाबत जळगाव, धुळे, नंदुरबार, पारोळा, बोरी परिसर, पारोळा तालुक्यातील अनेक सामाजिक कार्यकर्ता व पत्रकार आदि मान्यवरांनी शुभेच्छा देऊन अभिनंदन केले.