ताज्या बातम्या

वर्ध्यातील पवनार येथे वंचित बहुजन आघाडीची शाखा स्थापन….

वर्धा – पवनार या गावा मध्ये वंचित बहुजन आघाडी ची नवीन शाखा जिल्हा अध्यक्ष अजय घंघांरे यांच्या निर्देशाने आणि जिल्हा संघटक श्री सहदेव चाटे यांच्या नेतृत्वात शाखा स्थापन करण्यात आली. हा सोहळा बस स्टॅन्ड चौक मध्ये. संपन्न झाला. या शाखेच्या अध्यक्ष म्हणून रंजित घोंगडे यांची नियुक्ती जिल्हाध्यक्ष अजय घंगारे यांनी केली. उपाध्यक्ष म्हणून मनोज भगत, सचिव म्हणून पांडुरंग भगत,, सहसचिव म्हणून शंकरराव खडसे यांची नियुक्ती करण्यात आली.या प्रसंगी अनेक मान्यवरांचे मार्गदर्शन झाले, त्यात सिद्धार्थ डोईफोडे, संजय हाडके, वसंत मुरारकर, निताताई गणवीर, संदीप नगराळे, संतोष भगत, सुनील खत्री वर्धा तालुकाध्यक्ष आणि प्रदीप भगत, सोपानजी टेम्भूर्णे यांचा समावेश होता. अध्यक्षीय भाषण प्रा पुरुषोत्तम खोब्रागडे यांनी केले.या प्रसंगी स्थानिक आणि आजूबाजूच्या परिसरातील भरपूर कार्यकर्ते उपस्थित होते. त्यात प्रामुख्याने वासुदेव खोब्रागडे, हर्ष तोटे, अमोल थुल, नितीन कवाडे, मंगेश नगराळे, राहुल पाटणकर,धम्मानंद जगताप, adv दिक्षा शेंद्रे, शीतल कांबळे, रमेश धोंगडे आणि ईतर कार्यकर्ते यांचा समावेश होता.वंचित बहुजन आघाडी च्या आणखी शाखा काढण्याचा मानस असण्याचा आयोजकांनी सांगितलं. तसेच आणखी आजूबाजूच्या परिसरातील कार्यकर्ते या पुढे वंचित बहुजन आघाडी मध्ये प्रवेश करणार असल्याचे आश्वासन आयोजक आणि जिल्हा संघटक सहदेव चाटे यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *