श्री समस्त बारी पंच जळगाव यांची सन २०२१-२२ ची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न

दिनांक २२/०१/२०२३ रोजी श्री.समस्त जळगांव बारी पंच यांची वार्षिक सर्वसाधारण सभा समाजाचे जोशी पेठ येथील हितवर्धिनी हॉल येथे संपन्न झाली. सभेची सुरुवात समाजाचे आद्य संत श्री रूपलाल महाराज यांच्या प्रतिमा पूजनाने झाली नंतर सभेची प्रस्तावना संस्थेचे उपखजिनदार लतीश बारी यांनी मांडली तर मागील सभेचे इतिवृत्त संस्थेचे उपसचिव महेंद्र बारी यांनी सादर केले मागील वर्षाचे २०२१-२२ चे अहवालांचे वाचन संस्थेचे खजिनदार बालमुकुंद बारी यांनी केले तर संस्थेचे उपाध्यक्ष अरुण बारी यांनी उपस्थितांचे आभार मानले.सभेप्रसंगी समाजाचे आगामी काळातील उपक्रमाबाबत सर्व उपस्थितांसमोर विचार विनिमय करण्यात आला आणि समाजाच्या महिलांसाठी आगामी काळात कार्यक्रमांच्या आयोजनाचे नियोजन करण्यात आले.समाजाने समाजभवनासाठी मन्यारखेडा शिवारात गट नंबर १येथे समाजभवनासाठी ११००० स्क्वेअर फुट जागेची सौदा पावती केली असून संबंधित जागेच्या खरेदी कामी आणि बांधकामाचे नियोजन सभेप्रसंगी आखण्यात आले.सभेसाठी समाजातून मोठ्या प्रमाणावर समाज बांधव भगिनी आणि वयस्कर वर्ग उपस्थित होता.सभा यशस्वी करण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष विजय बारी, उपाध्यक्ष अरुण बारी,सचिव हर्षल बारी,खजिनदार बालमुकुंद बारी,उपसचिव महेद्र बारी,उपखजिनदार लतीश बारी प्रसिद्धी प्रमुख नितीन बारी,सदस्य राहुल पाटील,राजेंद्र बारी,विजय बारी यांनी परिश्रम घेतले तसेच बारी समाज महिला मंडळ अध्यक्षा इंदुताई बारी,उपाध्यक्ष सीमा कोल्हे,सदस्य एकता बारी,संगीता बारी आणि समाजातील गजानन बारी,सुभाष बारी,विठ्ठल बारी,शिरीष कोल्हे,सुनील बारी सागर बारी आदी मान्यवर उपस्थित होते.
