सारजाई कुडे व बालकवी ठोंबरे विद्यालयाची गीता चौधरी व तनिष्का भागवत या रांगोळी स्पर्धेत तालुक्यात प्रथम

धरणगाव – येथील सारजाई दामोदर कुडे माध्यमिक विद्यालय व बालकवी ठोंबरे शाळेची इयत्ता नववी (क)च्या विद्यार्थिनी कु गीता दत्तात्रेय चौधरी व कु तनिष्का नितीन भागवत या दोघी विद्यार्थिनींनी तहसील कार्यालय, धरणगाव येथे राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त माझं मत माझं भविष्य या विषयावर रांगोळी स्पर्धेत तालुक्यातून प्रथम क्रमांक मिळवून रुपये 1001/- चे बक्षीस पटकावले.त्यांचा गौरव तहसीलदार मा नितीनकुमार देवरे साहेब यांच्याहस्ते बक्षीस देऊन अभिनंदन करण्यात आले. प्रसंगी अन्य सन्माननीय अधिकारी वर्ग यांनीही कौतुक केले, त्यांच्या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष हेमलालशेठ भाटिया सचिव प्रा रमेश महाजन सर्व सन्माननीय संचालक मंडळ माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक एस एस पाटील प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक जीवन पाटील तसेच शाळेतील सर्व शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी यांनी त्यांचे अभिनंदन केले
