जळगांव जिल्हाताज्या बातम्या

महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सतर्फे जैन इरिगेशनचा गौरव

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याहस्ते जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांनी स्वीकारला पुरस्कार

नाशिक – महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स उत्तर महाराष्ट्र नाशिक शाखेतर्फे सुवर्ण वर्ष महोत्सवानिमित्त दोन दिवसांची विकास परिषद आयोजीत करण्यात आली होती. या परिषदेमध्ये कान्हदेशच्या विकासात महत्त्वपूर्ण योगदान दिल्याबद्दल जैन इरिगेशन सिस्टीम्स लि. चा गौरव करण्यात आला. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याहस्ते जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, सहव्यस्थापकिय संचालक अतुल जैन यांनी पुरस्कार स्वीकारला. पुरस्कार समारंभ नाशिक येथील कालीदास कलामंदिर येथे पार पडला.याप्रसंगी व्यासपीठावर पालकमंत्री छगन भुजबळ, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स चे अध्यक्ष ललित गांधी, उपाध्यक्ष उमेश दाशरथी, सुधाकर देशमुख उपस्थित होते.या कार्यक्रमास खासदार हेमंत गोडसे, खासदार उन्मेष पाटील, आमदार देवयानी फरांदे , महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास आयुक्त दीपेंद्र कुशवाह, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हाधिकारी गंगाथरन डी. व नाशिक जिल्हाचे पोलीस अधिक्षक व अनेक मान्यवर उपस्थित होते .महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स च्या दोन दिवसीय विकास परिषदेत केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, आरोग्य व कौशल्य विकास मंत्री राजेश टोपे, वेगवेगळ्या सत्रांमध्ये सहभागी झाले होते. या परिषदेसाठी राज्यभरातील 120 पदाधिकारी सहभागी झाले होते. विकासात महिलांचा सहभाग वाढविणारे धोरण, औद्योगिक विकासात नव्या तंत्रज्ञानाचा सहभाग, पर्यटन आणि क्लस्टर बेस डेव्हलपमेंटचे धोरण यावर विचार मंथन करण्यात आले.  जैन इरिगेशन सिस्टीम लि. यांच्यासह महिंद्रा एण्ड महिंद्रा, एचएएल, सह्याद्री फार्म, बेदमुथा इंडस्ट्री, नाशिक, दादासाहेब रावल ग्रुप ऑफ इंडस्ट्री, शिरपूर एज्यकेशन सोसायटी, महाराष्ट्र सलवंत एक्सट्रेक्शन- धुळे, मालपाणी ग्रुप-संगमनेर नगर, यांचाही राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याहस्ते गौरव यावेळी करण्यात आला.
फोटो कॕप्शन – राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याहस्ते महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचा पुरस्कार स्वीकारताना जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, सहव्यवस्थापकीय संचालक अतुल जैन सोबत पालकमंत्री छगन भुजबळ, महाराष्ट्र चेंबर आॕफ काॕमर्सचे अध्यक्ष ललित गांधी, उपाध्यक्ष उमेश दाशरथी, सुधाकर देशमुख.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *