जळगांव जिल्हा

सत्रासेन येथे जितेंद्र महाजन यांचे ग्रामीण शिबीरार्थी विद्यार्थी यांना स्वच्छ भारत मिशन बाबत मार्गदर्शन

सत्रासेन – येथे भगिनी मंडळ संचलित, समाजकार्य महाविद्यालय चोपडा याचे एफ वाय बी एस डब्ल्यू व एम एस डब्ल्यू भाग १ यांचे क्षेत्रकार्य अंतर्गत सहभागीय ग्रामीण शिबीराचे धनाजी नाना आदिवासी आश्रमशाळा सत्रासेन येथे आयोजन दिनांक ७ एप्रिल ते १३ एप्रिल २०२२ या कालावधीत करण्यात आले आहे.   सदर शिबीरार्थी विद्यार्थ्यांना ग्रामीण जीवन व तेथील विविध समस्या याबाबत माहिती मिळावी तसेच त्या समस्या सोडवण्यासाठी ज्ञान मिळावे यासाठी विविध व्याख्यानाचे आयोजन करण्यात येते दिनांक ९ एप्रिल रोजी भगिनी मंडळ कॉलेज ऑफ सोशल वर्क अल्युमनी असोशियशन चोपडा चे अध्यक्ष तथा चोपडा पंचायत समितीचे स्वच्छ भारत मिशन चे तालुका समन्वयक जितेंद्र महाजन यांचे स्वच्छ भारत मिशन या योजने बाबत व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते सदर व्याख्यानात त्यांनी स्वच्छ भारत मिशन योजनेबद्दल तसेच योजने अंमलबजावणी प्रोत्साहनपर निधी, वैयक्तिक स्वच्छता, सार्वजनिक स्वच्छता, शालेय स्वच्छता, कचऱ्याचे वर्गीकरण,सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन, हागणदारीमुक्त गाव, अश्या विषयावर स्वच्छतेबाबत मार्गदर्शन केले तसेच स्वच्छ भारत मिशन बाबत गाव पातळीवर शौचालय वापराबाबत, प्लास्टिक वापर बंद करणे बाबत विद्यार्थ्यांनी गावागावात जनजागृती करणे संदर्भात आव्हान केलं.   

त्याप्रसंगी ग्रामीण शिबीराचे संयोजक प्रा डॉ राहुल निकम, प्रा डॉ संबोधी देशपांडे, प्रा डॉ सोनकांबळे उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *